झोपडीत राहणाऱ्या मजुराला दिले 19840 रुपयाचे बिल #electricitybill #chandrapur #chimur
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर चिमूर:- चिमूर येथील इंदिरा नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या मजूरास एकोनविस हजार आठसे चाळीस रुपयाचे विज बिल आल्याने महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला आहे. याची तक्रार दोन वेळा करून सुधा महावितरणचे अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
चिमूर येथील इंदिरा नगर येथील रहिवासी अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी या रोज मजुरी करून झोपडीच्या घरात राहणाऱ्या मजुराला एकोणीस हजार आठसै चाळीस रूपयाचे वीज बिल (electricity bill) आले आहे. यांचे टीनाचे घरात लाइट आणि एका पांख्यशिवाय अन्य एकही विद्युत उपकरण नाही, तरीही महावितरणने 1253 युनिट दाखऊन पाठवलेले वीजबिल पाहून विद्युत ग्राहकास धक्का बसला. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भाने विद्युत ग्राहक अल्ताफ अहेमद अब्बदुल सत्तार कुरेशी यांनी 17/04/2023 व 8/5/2023 रोजी मिटर फालटी असून योग्य चौकसी करून तात्काळ मिटर बदलऊन देण्यासंदर्भात दोन वेळा अर्ज केला. आठ ते दहा दिवस चकरा माराव्या लागल्या परंतु महावितरण अधिकाऱ्यांनी आता पावेतो कोणतीच दखल घेतली नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत