शेतकऱ्याची कोर्टात केस सुरु असल्याने वादग्रस्त शेतीची मोजणी अखेर रद्द #chimur


न्यायप्रविष्ट विरोधी कार्य न केल्याने शेतकऱ्याने मोजणी अधिकारी यांचे मानले आभार

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- एकाच शेती वरून दोन शेती मालकाचा वाद निर्माण झाल्याने केस कोर्टात दाखल केली असताना सुधा दुसऱ्या शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयच्या माध्यमातून वादग्रस्त शेती जागा मापण्याच्या प्रयत्न केला परंतु मूळ शेतीमालकाने शेतीची केस कोर्टात आहे तुम्ही मापणी करू शकत नाही अशी विनंती करताच अधिकाऱ्यांनी जागा मापनी थामबविली त्यामुळे आनदित झालेल्या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केल


सविस्तर वृत्त असे की मूळ शेती मालक राजकुमार वामन शेळके याची शेती मौजा खांबाळा येथे आहे. भू.क्र.६३५/१ (हे.आर.१.६२) हि संपूर्ण शेती धाणारी असून नेरी येथील मोतीराम तिमाजी पिसे यांनी हि शेत जमीन माझी आहे असे म्हणत भूमिअभिलेख कार्यालय चिमूर येथे शेतीच्या जागेची मोजणी करण्याचा अर्ज केला आणि मोजणी अधिकारी शेतात पोहचले शेतीच्या मोजणीला सुरुवात करताच क्षणी मूळ शेत मालक राजकुमार वामन शेळके यांनी कुठल्याही प्रकारे भांडण न करता माझ्या शेतीचे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे सुरू असून अजूनही त्याचा निर्णय लागायचा आहे.त्यामुळे माझ्या शेतीची मोजणी आपण करू नये असे मोजणी अधिकारी यांना सांगितले सर्व दस्तावेज अधिकारी यांना दाखविले नंतर मोजणी अधिकारी यांनी या शेतीचे प्रकरण न्यायालयात सुरु असल्याने माझ्यामुळे कुठल्याही प्रकारची बाधा उपस्थित होऊ नये म्हणून मी मोजणी करू शकत नाही. असे स्पष्ट केले व शेतकरी राजकुमार वामन शेळके यांनी त्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत