Top News

संतोषसिंह रावत गोळीबार प्रकरण #chandrapur #mul #attack


काँग्रेस समर्थित दोन सख्या भावंडांना अटक

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात गाजत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तब्बल ११-१२ दिवसांनंतर आरोपींना अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे काँग्रेसचे असल्याचे पुढे आले असून दोन सख्या भावडांना अटक केली आहे. राजवीर कुंवरलाल यादव (३६), अमर कुंवरलाल यादव (२९) रा. आझाद चौक, बाबूपेठ, चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.

संतोषसिंह रावत यांनी वेकोलिमध्ये नोकरी लावून देतो म्हणून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, अडीच वर्षांचा कालावधी होऊनही नोकरी लावून दिली नाही. अन् पैसेही परत दिले नाहीत. या सख्या भावडांनी संतोष सिंह रावत यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर ११ मे रोजी रात्री ९:१९ वाजता मूल मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयातून स्कूटीने घरी जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी १६ पथके गठित केली होती. यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह लागले होते.

पोलिस अधीक्षकांनी अखेर तब्बल दहा दिवसांनंतर याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे सोपविली. नायक यांनी लगेच सूत्रे हलवून अवघ्या काही तासांतच राजवीर यादव, अमर यादव या दोघांना बाबूपेठ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात यश मिळविले. यानंतर आरोपींची झाडाझडती घेतली. यानंतर आरोपींनी तोंड उघडले. यामध्ये संतोष सिंह रावत यांनी वेकोलित नोकरी लावून देतो म्हणून यादव यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते; परंतु अडीच वर्षांचा कालावधी होऊनही नोकरी लावून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत. या रागातूनच रावत यांच्यावर गोळीबार केला, अशी कबुली आराेपींनी दिली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मात्र, रावत हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. वेकोलिच्या नोकरीशी त्यांचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करून आरोपींची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांना आरोपींना अटक करण्यासाठी अल्टिमेटम देणारे काँग्रेस नेता माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याचाही छडा पोलिस लावतील, असे बोलले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने