Top News

प्रवासादरम्यान ऑटो रिक्षातून महिलेने पळविले ९२,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने #chandrapur #ramnagarpolice #Arrested #theft

रामनगर पोलीसांनी आरोपींना केली अटक

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- पोलीस स्टेशन, रामनगर येथे दिनांक २९/०३/२०२३ रोजी फिर्यादी नामे सौ. प्रेमिला प्रदिप मोरे, वय २७ वर्ष, रा. गोपालपुरी वार्ड, आनंदनगर, बालाजी वार्ड, चंद्रपुर यांनी पोस्टेला तक्रार दिली की, दिनांक २८/०३/२०२३ रोजी वडील नामे खुशाब डोये यांचे चिमुर येथून चंद्रपुर आली. बस स्टॉफ, चंद्रपुर येथे उतरून ऑटो मध्ये बसुन इंदिरानगर, चंद्रपुरकडे जात असतांना बसलेल्या ऑटो मध्ये पुन्हा चार महिला बसल्याने ऑटोने जात असतांना मुलगी रडत असतांना माझे जवळील बॅग बाजुच्या महिलेकडे दिली. त्यानंतर थोड्याच वेळात परत बॅग घेतली. त्यानंतर इंदिरानगर चौकामध्ये उतरून मामाचे घरी जावुन बॅगची पाहणी केली असता, बॅगमधील ३४.८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किमंत ८०,०००/- रू. कानातील सोन्याचे टॉप्स ४.१४० ग्रॅम कि. १०,०००/- रू सोन्याची नथ १ ग्रॅम २५००/- असा एकुण ९२५००/- रु. चा माल अज्ञात महिलानी चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. ३२१/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

हेही वाचा:- गर्दीत चोरी करणाऱ्या महिला टोळीला रामनगर पोलीसांनी केली अटक
http://www.adharnewsnetwork.com/2023/05/chandrapur-police-ramnagar-police.html

वरील प्रमाणे पोस्टेला तकार प्राप्त होताच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी हे गुन्ह्यातील अज्ञात महिला आरोपीतांचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन, रामनगर हद्दीत रवाना होवुन गोपनिय बातमिदाराचे माहिती वरून संशयीत महिला आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहे. नमुद गुन्हा उघडकीस आणणे कामी पोलीस स्टेशन, रामनगर येथील गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्बल अकरे, पोउपनि मधुकर सामलवार तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व कर्मचारी अतीशय परिश्रम घेवुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी व चोरून नेलेले सोन्याचे दागीने जप्त केले आहे.


सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस, निरीक्षक राजेश मुळे, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा / २४५४ प्रशांत शेंदरे, मपोहवा / अनिता मोहुर्ले, नापोशी / २४३० लालु यादव, नापोशि/ १११८ मिलींद दोडके, नापोशि/ २१८२ चिकाटे, नापोशि/ ११६५ आनंद, नापोशि/ ९१७ निलेश मुडे, नापोशि/ ५३२ सतिश अवथरे, पोशि/ ६९९ विकास जाधव, पोशि/ २५१३ विकास जुमनाके, पोशि/ ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि/ ८८१ संदिप कामडी, यांनी केलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने