चंद्रपुरात दोन गटांतील वादात निघाल्या तलवारी #chandrapur #Swords

Bhairav Diwase
0

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- जुन्या वादातून दोन गटांमध्ये तलवारी निघाल्याची घटना शुक्रवारी शहरातील चांडक मेडिकल जवळील अंजुमन मस्जीदजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी इमदाद अत्ता रहमान, मोहम्मद अतिक उर-मुजीब रहमान, मोहम्मद शोएब मुजीब रहमान, सैफ उर अत्ता रहमान या चौघांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तर, इमदाद अत्ता रहमान हा जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. (In Chandrapur, swords were drawn in a dispute between two groups)


फिर्यादी साहील फारुख कुरेशी व आरोपीमध्ये दीड महिन्यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी जुम्माचा दिवसा असल्याने ते सर्व जण नमाज पठण करण्यासाठी अंजुमन मस्जीदजवळ गेले. नमाज पठण झाल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्या वाद सुरू झाला. यावेळी फिर्यादीला मारण्यासाठी दुसऱ्या गटाने तलवार काढली. मात्र, फिर्यादीला तलवार न लागता त्यांच्याच गटातील इमदाद अत्ता रहमान याला तलवार लागल्याने तो जखमी झाला. फिर्यादी साहील फारुख कुरेशीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल स्थूल करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)