रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू #chandrapur #visapur #accident

Bhairav Diwase


Google ads.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर गाव रेल्वे मार्गामुळे विभागले आहे. या गावाच्या मध्य भागातून तीन रेल्वे मार्ग असून, चौथ्या मार्गाचे काम सुरू आहे. याच रेल्वे मार्गाने एक वृद्ध जात असताना गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर रेल्वेची जबरदस्त धडक बसली. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६:२० वाजता विसापूर गावाजवळ खांब क्रमांक ८८५/० जवळ घडली.

नामदेव कर्नू पुणेकर (७३) रा. सिद्धार्थ वॉर्ड, विसापूर असे मृताचे नाव आहे. नामदेव पुणेकर हे नाल्यावर अंघोळीला जात होते. मागून येणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना जबरदस्त धडक दिली. या धडकेत नामदेव पुणेकर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.