रावत म्हणाले मी आरोपींना ओळखत नाही, शिवाय माझा वेकोलिशी काहीही संबंध नाही #chandrapurhttps://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- माझी व दोन्ही आरोपींचीही नार्को टेस्ट करावी. जे सत्य आहे ते या नार्को टेस्टने समोर येईल. जिल्ह्यातील शांतता नेमकी कोण भंग करीत आहे व हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून कोण राजकीय वर्चस्व गाजवू इच्छित आहे, हे या तपासणीने जनतेसमोर येईल, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.

प्रसिध्दीपत्रकात रावत यांनी नमूद केले आहे की, 11 मे रोजी मुल येथे गोळीबार करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना पोलिस विभागाने अटक केली. पोलिस तपासयंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वेळ लागेल मात्र एक दिवस सत्य जरूर बाहेर येईल याची मला खात्रीही आहे. काही मुलांना वेकोलित नोकरी लावून देतो म्हणून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरी लावून दिली नाही. पैसेही परत करीत नसल्याने हा हल्ला केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. मात्र, या दोन्ही बाबी सपशेल चुकीच्या आहेत. एकतर मी आरोपींना ओळखत नाही. शिवाय माझा वेकोलिशी काही एक संबंध नाही.

मी काँग्रेस पक्षाचा जुना कार्यकर्ता व पदाधिकारी आहे. आरोपी हेही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत तथा पक्षीय सहसंबंधाने एखाद्या कार्यक्रमात जाणता अजाणता त्यांच्याशी संपर्क येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तो संबंध हा तेवढ्या पक्षीय कार्यक्रमापुरताच आहे. माझे व्यवसाय, माझे काम करण्याचे क्षेत्र हे वेगळे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वेकोलि कार्यक्षेत्राशी माझा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे आरोपीकडून सांगण्यात येत असल्याचे कारण हे दिशाभूल करणारे व चुकीचे आहे. जर माझे आरोपींसोबत संबंध असेल तर ते 'कॉल डिटेल्स', भेटीगाठीचे 'सीसीटीव्ही फुटेज', कार्यक्रमातील छायाचित्र, बघणार्‍यांचे बयान आदींवरून सिध्द होवू शकते. त्याचाही तपास करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने