Top News

राज्यस्तरीय ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये नाशिक संघ अंतिम विजेता #chandrapur



बारामती:- संत निरंकारी मिशनच्या समाज कल्याण विभागा मार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट २०२३ च्या क्रिकेट स्पर्धा सचिन रमेश तेंडुलकर मैदान पेण (रायगड) येथे दिनांक ०६ व ०७ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५.०० या वेळेत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उदघाटन मोहन छाबराजी (मेम्बर इन्चार्ज- संत निरंकारी मंडळ दिल्ली) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी रायगडचे झोनचे प्रभारी प्रकाश म्हात्रे, सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी अधिकारी उपस्थित होते.

या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड, रत्नागिरी, कोल्हापुर, छत्रपती संभाजी नगर, धुळे, सातारा, सोलापूर, पुणे, डोंबिवली, मुबंई -१, मुंबई-२, मुंबई- ३, मुबंई- ४, नाशिक अशा एकूण १४ संघानी सहभाग घेतला होता.
या १४ संघांपैकी नाशिक संघ अंतिम विजेता ठरला. सातारा संघ उपविजेता ठरला.  रायगड- संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी मुंबई 2 हा संघ ठरला. मालिकावीर रमेश कोळी (क्षेत्र सातारा). 
     उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेता संघाला ट्रॉफी व अन्य सर्व संबंधित संघाना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
    खिलाडू वृत्तीने निकोप स्पर्धा भरवून तरुणांचा शारीरिक व मानसिक विकास घडवून आणणे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची दिव्य शिकवण धारण करून, शत्रू बुद्धी दूर ठेवून मैत्री भावनेचा आणि सद्गुणांचा अंगीकार करत या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.
   
   मंडळाच्या रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय प्रभारी प्रकाश म्हात्रे व सेवादल क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांच्या देखरेखीखाली  महाराष्ट्र स्पोर्ट्स कमिटीचे सर्वश्री बळीराम कासारे, मनोज सिंग कोटल, सतीश सामयिक, श्याम सिंह, चेतन पाटिल, कृष्णा, मारुती का कासारे जी यांच्या मार्गदर्शन आणी सहकार्याने अतिशय सुंदर प्रकारे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
    या सर्व स्पर्धेचे नियोजन महाराष्ट्र स्पोर्ट्स कमिटी  व रायगड झोन अंतर्गत पेण शाखेने तसेच रायगड क्षेत्रातील सर्व सेवादल अधिकारी व सेवादल बंधू भगिनी यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने