वेकोलीच्या साईडिंग लांबीकरणाचे काम बंद करा #chandrapur

Bhairav Diwase
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वेकोलीला सुचना


चंद्रपूर:- हिंदुस्तान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक 16 मधील शासकीय गोदाम, पंचशील चौक, दवे चौक, ढिवर मोहल्ला, बाबूपेठ वार्डातील नागरिकांनी माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांना "बाबूपेठ डब्लू सी एल साइडिंगचे लांबीकरण करत असलेले काम बंद करा" वार्डातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.

या संदर्भात माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगुलकर यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री, विकास पुरुष , चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जनतेची समस्या कळविली. मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तात्काळ चंद्रपूर जिल्हा महानगराचे अध्यक्ष श्री मंगेश गुलवाडे, माजी महापौर राहुलजी पावडे, भाजपा महामंत्री श्री ब्रिजभूषणजी पाझारे संबंधित विषया संदर्भात स्पॉट व्हिजिट करून संबंधितांना सूचना करण्याचे आदेश दिले.
स्पॉट व्हिजिट दरम्यान साइडिंगचे काम डब्लू सी एल अंतर्गत येत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे डब्ल्यू सी एल जनरल मॅनेजर श्री वैरागडे साहेब यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी व वार्डातील शिष्ट मंडळ यांच्या समवेत बैठक घेण्याच्या सूचना केले. डब्लू सी एल जनरल मॅनेजर यांच्यासोबत बैठकीत वार्डातील नागरिकांची चर्चा करण्यात आली. अनेक महत्वपूर्ण विषय भाजपा पदाधिकारी, नगरसेविका व जनतेतर्फे जनरल मॅनेजर साहेबांना सांगण्यात आले. वैरागडे साहेबांनी साईडींगचे काम संबंधित विषयावर तोडगा निघेपर्यंत काम बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी मंगेश गुलवाडे व राहुलजी पावडे व सौ कल्पनाताई बगूलकर यांनी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्यासाठी सन्माननीय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार लवकरच बैठक घेण्यात येईल असे जनतेला आश्वासत केले. संपूर्ण ताकतीने भारतीय जनता पार्टी जनतेच्या सोबत आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा महानगराचे अध्यक्ष श्री मंगेश गुलवाडे, माजी महापौर राहुलजी पावडे, भाजपा महामंत्री श्री ब्रिजभूषणजी पाझारे, चंद्रपूर जिल्ह्याचे डब्ल्यू सी एल जनरल मॅनेजर श्री वैरागडे साहेब, माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर, लालपेठ डब्ल्यू सी एल सब ऐरीया मॅनेजर पोडे साहेब व वार्डातील महेश कातकर, वामनराव शेंडे, नंदकिशोर बगूलकर, विपुल मजूमदार, मधूकर ऊमरे, सौ कमलाबाई मडावी, श्रीमती रूपा मसराम, ताराबाई अलोणे, उषाबाई खोब्रागडे, अल्काबाई आत्राम, धोटेताई, बारसागडे ताई, लताबाई खूटमाटे, विमलाबाई गफरे, कुसूम जांभुळकर, हर्षा दूर्गे, अनिल पाटील, सुनिल पाटील, भैय्याजी कांबळे, नितिन देशकर, नरेश खोब्रागडे व इतर नागरीक उपस्थित होते.