चंद्रपूर:- हिं. लालपेठ काॅलरी प्र क्र १६ मधील लालपेठ वार्ड येथे आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर करण्याबाबत माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी मागणी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री मा ना श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली. 2011 च्या जनगणनेनूसार 8,500 लोकसंख्या असलेला लालपेठ वार्ड आहे. येथील लोकांना 2. कि.मी. लांब बागला चौक येथे आरोग्य तपासणी व सूवीधेचा लाभ घेण्यासाठी याव लागते. म्हणून संपूर्ण लालपेठ काॅलरी वार्डातील नागरिकांची मागणी लक्षात घेता सौ कल्पनाताई बगूलकर यांनी मागणी केली.
यावेळी भाजपा पदाधिकारी श्री रघू गूंडला, श्री आकाश लक्कापुल्लावार, नंदकिशोर बगूलकर, अभाविप जिल्हा संयोजक श्री शैलेश दिंडेवार, विनोद पेन्नीलवार, ईतर उपस्थित होते.