112 वर‌ कॉल अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले "त्या" महिलेचे प्राण! #Chandrapur #Rajura #call112

राजुरा:- 11 जुन ला रात्री 9 वाजता जोगेश्वर नवेगावला जाऊन" तु माझ्या घरचे पैसे का आणलीस "या शुल्क कारणावरून भांडण करीत असतांना 112 वर काल केल्याने विरुर पोलिसांना माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल हे आपल्या ताफा सह नवेगाव येथे पोहोचले असता आरोपी जोगेश्वर गणपत सिडाम याने आपल्या हातातील ब्लेडने पत्नी फिर्यादी रोशनी गणपत सिडाम हिच्या गळ्यावर बेल्ड मारून गंभीर जखमी केले.

 परिस्थितीचा आढावा लक्षात घेऊन लगेच जखमी महिलेस उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी परिस्थिती अति चिंताजनक असल्यामुळे सदर महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. ("That" woman's life was saved due to the call to 112 and the alertness of the police!)

पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेड मारून केले गंभीर जखमी

फिर्यादी महिलेच्या बयानावरून आरोपी जोगेश्वर गणपत सिडाम वय 49 यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली,घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सचिन मडावी, पोलीस हवालदार माणिक वाग्धरकर, भुजंगराव कुळसंगे, मल्लेश नर्गेवार, पोलीस शिपाई भगवान मुंडे, स्वप्निल चांदेकर, अतुल शहारे हे करीत आहे.
असं काय घडलं असेल?

"तु माझ्या घरचे पैसे कां आणलीस" या शुल्क कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने मारून गंभीर जखमी केल्याची घटना 11 जुन ला रात्री 9 वाजता च्या सुमारास नवेगाव येथे घडली. राजुरा तालुक्यातील येत असलेल्या अन्नूर येथील जोगेश्वर गणपत सिडाम यांचा मागील काही वर्षापूर्वी विवाह झाला होता पण तो सतत मद्द प्राशन करीत असल्यामुळे पहिली पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेली, नंतर त्याने 2020 मध्ये नवेगाव येथील रोशनी शी प्रेम विवाह केला व अन्नूर येथे राहत असतांना तिला सुद्धा नेहमी सतत मद्द प्राशांन करून तिचा मानसिक छळ करीत होता ती त्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेर गावी आई कडे नवेगावला येऊन राहत होती तो सतत मद्द प्राशन करून शासनाच्या 112 वर विनाकारण काल करून दिशाभूल करीत होता. काल 11 जुन ला रात्री 9 वाजता जोगेश्वर नवेगावला जाऊन" तु माझ्या घरचे पैसे का आणलीस "या शुल्क कारणावरून भांडण करीत होता. आरोपी जोगेश्वर गणपत सिडाम याने आपल्या हातातील ब्लेडने पत्नी फिर्यादी रोशनी गणपत सिडाम हिच्या गळ्यावर बेल्ड मारून गंभीर जखमी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत