पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेड मारून केले गंभीर जखमी #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

राजुरा:- "तु माझ्या घरचे पैसे कां आणलीस" या शुल्क कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने मारून गंभीर जखमी केल्याची घटना 11 जुन ला रात्री 9 वाजता च्या सुमारास नवेगाव येथे घडली.

112 वर‌ कॉल अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले "त्या" महिलेचे प्राण!

राजुरा तालुक्यातील येत असलेल्या अन्नूर येथील जोगेश्वर गणपत सिडाम यांचा मागील काही वर्षापूर्वी विवाह झाला होता पण तो सतत मद्द प्राशन करीत असल्यामुळे पहिली पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेली, नंतर त्याने 2020 मध्ये नवेगाव येथील रोशनी शी प्रेम विवाह केला व अन्नूर येथे राहत असतांना तिला सुद्धा नेहमी सतत मद्द प्राशान करून तिचा मानसिक छळ करीत होता ती त्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेर गावी आई कडे नवेगावला येऊन राहत होती तो सतत मद्द प्राशन करून शासनाच्या 112 वर विनाकारण काल करून दिशाभूल करीत होता.

 11 जुन ला रात्री 9 वाजता जोगेश्वर नवेगावला जाऊन" तु माझ्या घरचे पैसे का आणलीस "या शुल्क कारणावरून भांडण करीत होता. आरोपी जोगेश्वर गणपत सिडाम याने आपल्या हातातील ब्लेडने पत्नी फिर्यादी रोशनी गणपत सिडाम हिच्या गळ्यावर बेल्ड मारून गंभीर जखमी केले.

विरुर पोलिसांना माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल हे आपल्या ताफा सह नवेगाव येथे पोहोचले असता परिस्थितीचा आढावा लक्षात घेऊन लगेच जखमी महिलेस उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी परिस्थिती अति चिंताजनक असल्यामुळे सदर महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)