स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यांच्यावरील गुन्हे मागे घ्या

Bhairav Diwase
0

शिवसेना-युवासेना तर्फे नागभीड पोलीस स्टेशन येथे निवेदन

नागभीड:- चंद्रपुर जिल्ह्यातील नाडभीड येथे दिनांक 13 जून 2023 रोज मंगळवारला चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे आणि मनिषभाऊ जेठांनी युवा सेना जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी तथा स्थानिक माता-भगिनी यांच्यावर कुठल्याही प्रकारची अनुसूचित घटना घडलेली नसतांना सुध्दा माजरी पोलीस अधिकारी यांनी खोटे गुन्हे दाखल केले असून सदर गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या याकरिता शिवसेना युवासेना तर्फे नागभीड पोलीस स्टेशन येथे शिवसेना युवासेना पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील निवेदन सादर केले.

 यावेळी निवेदन देताना युवासेना उपजिल्हाप्रमुख नाजीम शेख, शिवसेना तालुका संघटक विकी मडकाम, युवासेना तालुकाप्रमुख अमोल मांढरे, शिवसेना शहरप्रमुख अमित अमृतकर, युवासेना शाखाप्रमुख अंकुश मांढरे, मंगेश मांढरे, बालू मेश्राम, मयूर जीवतोडे, प्रकाश नाणे समस्त शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)