बल्लारपूर:- प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर शहरातील टेकडी विभागात एका युवकाला त्याच्याच परीसरातील 5 युवकांनी मिळून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. दीपक कैथवास असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दीपक कैथवास याच्यावर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. तो नेहमीच कुणासोबतही वाद घालत असल्याने परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती. दीपक हा परिसरातील नागरिकांना सुद्धा नेहमी त्रास द्यायचा. आरोपी युवकांवर सुद्धा दीपक ने अनेकदा वाद घालत त्यांना मारहाण केली होती. त्या मारहाणीचा बदला व त्याची निर्माण झालेली दहशत संपविण्यासाठी रात्रीच्या सुमारास दीपक ला त्या युवकांनी गाठले. रॉड, दांड्याने दिपकवर जोरदार प्रहार करण्यात आला. त्या मारहाणीत दीपक चा मृत्यू झाला.
बल्लारपूर शहरातील रवींद्रनगर वार्ड, कारवा रोड येथे राहणारा 28 वर्षीय दीपक कैथवास या युवकाची 5 जणांनी मिळून हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना 15 जुन रोजी रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास मौलाना आझाद वार्डात घडली आहे. हत्येनंतर 5 जणांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये स्वःताला पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत