बस स्थानकातील हाॅटेल जळून खाक #chandrapur #bhadrawati #Fire #firenews(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील नवीन बस स्थानकातील बाबुजी टी स्टॉल या हाॅटेलला दि.१७ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत संपूर्ण हाॅटेल जळून खाक झाले असून हाॅटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
    आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.परंतु अग्निशमन दल पोहोचेपर्यंत हाॅटेलची राखरांगोळी झाली होती. 
आगीत हाॅटेलमधील फर्निचर, खाद्यपदार्थ व इतर वस्तू जळून नष्ट झाल्या. या बसस्थानकात अनेक वर्षांपासून हे एकमेव हाॅटेल आहे. आजुबाजुला कोणतेही दुकान नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत