गळफास घेऊन युवकाची आत्महत्या #chandrapur #bhadrawati #suicide

Bhairav Diwase

भद्रावती:- येथील विंजासन वार्डातील एका युवकाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घड‌ली.
सिद्धांत ज्योतींद्र गोवर्धन (२३) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तो आपल्या आई व लहान भावासोबत राहात होता. त्याची आई नेताजी नगर बंगाली कॅम्प येथील जि. प. शाळेत शिक्षिका होत्या. त्यांची नुकतीच बदली झाली आणि घटनेच्या दिवशी ते बदलीच्या ठिकाणी जाणार होते. परंतु त्याच दिवशी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.