चंद्रपूर:- पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी रविवार, २५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या, सभेत जनतेशी संवाद साधणार आहेत.
यावेळी सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया,माजी आमदार व सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला नागरिकांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत