Click Here...👇👇👇

पाईपलाईन फुटल्याने मोहबाळा गावात पाण्याचे दुर्भिक्ष #chandrapur

Bhairav Diwase

भद्रावती:- गावातील पाईपलाईन फुटल्याने तालुक्यातील मोहबाळा गावात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून ग्रामस्थांना वनवन भटकावे लागत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोहबाळा गावातील नळ योजनेतील टाकीचे पाईप फुटल्याने दोन दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाणीटंचाई ला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सिध्दार्थ पेटकर यांनी सांगितले की, मागील एक महिन्यापासून गावात काही नागरिकांच्या नळाला पाणी येते, तर काही नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही. दोन दिवसा पासून टाकीची पाईपलाईन फुटल्याने गावातील संपूर्ण पाणी पुरवठा बंद आहे.

 या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच सौ वाघ यांना विचारणा केली असता याविषयी मला काहीच बोलायचे नाही असे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयांतून निघुन गेल्या. तसेच ग्रामसेवक यांनीसुद्धा काही बोलण्यास नकार दिला. 

      फुटलेली पाईपलाईन कमी खर्चात दुरुस्त होऊ शकते. तरी देखील ग्रामपंचायत दुरुस्ती का करत नाही. असाही प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे.