अन् अधिकाऱ्यांना धारेवर धरताच विद्यार्थिनीला मिळाला दाखला #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

भद्रावती:- एका दाखल्यासाठी ३० कि.मी. अंतरावरुन आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीला १० दिवसांनंतर ये म्हणून परत पाठविणाऱ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरताच १० मिनिटांत दाखला देण्यात आल्याची घटना भद्रावती शहरातील एका कार्यालयात सोमवारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मुधोली येथील एक आदिवासी विद्यार्थिनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता आवश्यक असलेला दाखला मागण्याकरिता येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात तीन-चार वेळा येऊन गेली. परत ती दि.१२ जून रोजी आली असता तिला कनिष्ठ अधिकाऱ्यांनी व दलालांनी प्रमुख अधिकाऱ्यांना भेटू दिले नाही व १० दिवसांनी यायला सांगितले. वारंवार चकरा मारुनही आपल्याला दाखल मिळत नाही या प्रकाराने निराश झालेल्या सदर विद्यार्थिनीने येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांना माहिती दिली. लगेच इम्रान खान यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले व या कार्यालयातील दलालांना आवर घालण्याची मागणी केली. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला दस्तऐवज त्वरीत देण्यात यावे अशी मागणी केली.अन्यथा भाजयुमो तर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांनी या मागण्या लगेच मान्य केल्या व 'त्या' आदिवासी विद्यार्थिनीला लगेच दाखला दिला. त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे व इम्रान खान यांचे 'त्या' विद्यार्थिनीने आभार मानले.

नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपली कामे सोडून शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात.मात्र त्यांना लवकर दाखले मिळत नाहीत. त्यामुळे प्रसंगी प्रवेशापासून वंचितही राहावे लागते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)