नेरी प्रायमरी क्रेडिट संस्थेत स्वस्थ धान्य वितरणात गोरगरीब लाभार्थ्याची गैरसोय? #Chandrapur #chimur


चिमूर:- नेरी येथील प्रायमरी क्रेडिट मर्या सहकारी संस्थेत स्वत धान्य दुकान वितरण प्रणाली असून गोरगरीब जनतेला लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिल्या जाते दि 12 जूनला सकाळी 6 ते 7 वाजता पासून लाभार्थी महिला पुरुष( राशन) धान्य घेण्यासाठी आले असता बोटावर मोजण्या इतक्या लोकांना धान्य देण्यात आले मात्र अनेक लाभार्थ्यांना ताटकळत ठेवून कुणालाही धान्य वितरित केले नाही विचारले तर मशीन खराब झाली, वेळ लागेल असे अनेक कारणे सांगून हुसकावून लावीत होते आता मिळणार नाही 3 वाजता या अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे लाभार्थी महिला पुरुष वैतागून गेले असून ही हुकुशाही असल्याचे बोलीत आहेत तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी

शासनाने गोरगरीब जनतेला जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून देत असते प्रत्येक महिन्याला धान्याचे वितरण केले जाते यासाठी सकाळीच शेतकरी गोर गरीब जनता धान्य दुकानात हजेरी लावत असतात लवकर धान्य घेऊन आपल्या रोजीरोटी जावे हा मानस ठेवून रांगेमध्ये उभे राहतात परंतु नेरी येथील प्रायमरी क्रेडिट सहकारी संस्थेत कर्मचाऱ्यांच्या मनमर्जी कारभारा मुळे सकाळपासून आलेले लाभार्थी हे ताटकळत उभे होते धान्याची विचारणा केली तर कर्मचारी बेजबाबदार कारणे सांगून लाभार्थ्या परत पाठवीत होते यामुळे सकाळी पासून उपाशी तापासी धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना गैरसोयी चा सामना करावा लागत असे तसेच कुणाला दुपारनंतर या असे सांगून दर अर्ध्या तासाणे जवळच असलेल्या भट्टीत ठंड पाणी प्यायला जाणे त्यामुळे जनतेत कर्मचाऱ्यांच्या या वागणुकी विरोधात आक्रोश निर्माण झाला त्यामुळे अनेक लाभार्थी हे आजच्या रोजीरोटी पासून वंचीत झाले असून त्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा अश्या उर्मट कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून संस्थेवर सुद्धा कारवाई करावी करावी अशी मागणी महिला पुरुषा नागरिक यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत