स्पंदन मानकर ची नवोदय साठी निवड #chandrapur #bhadrawati


भद्रावती:- मुरसा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक व जवाहर नवोदय विद्यालय वर्धा चे माजी विद्यार्थी श्री. एस एच मानकर यांचा मुलगा तसेच भद्रावती येथील साई कॉन्व्हेंटचा इयत्ता सहावी चा विद्यार्थी स्पंदन मानकर याची जवाहर नवोदय विद्यालय तळोधी, चंद्रपूर साठी निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे स्पंदन हा या वर्षी जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या जागतिक आलामा अब्याकस स्पर्धेत जगातून दुसरा आला होता त्याने नवोदय परीक्षेचा सराव चंद्रपूर येथील प्रसिद्ध नरोटे कोचिंग क्लास मधून केला होता तो आपल्या यशाचे श्रेय नरोटे कोचिंग क्लास चे संचालक ज्ञानोबा नरोटे सर, त्याच्या शिक्षकांना व आई वडिलांना देतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या