शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथे जागतिक योग दिन साजरा #gadchandur


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहरातील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक 21 जूनला सकाळी ७ वाजता महाविद्यालच्या पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन शारीरिक शिक्षण विभागातर्फे साजरा करण्यात आला.

या वर्षीच्या "हर घर अंगण योग" या थीमपासून प्रेरणा घेऊन, शारीरिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व सांगून त्यांच्या जीवनात आणि सर्वसामान्यांना योग लाभदायक बनवण्याची शपथ घेतली. यावेळी शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. सत्येंद्र बी. सिंग, डॉ. हेमचंद दुधगवळी, डॉ सुनील सर. डॉ. राजेश सर आणि डॉ.माया मसराम, तसेच महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत