ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे 'योग आणि आरोग्य' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0
चिमूर:- दिनांक 21 जून 2023 रोजी ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'योग आणि आरोग्य' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आला.
या कार्यशाळेच्या अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी तसेच प्रमुख वक्ते आणि योग निर्देशक म्हणून डॉ. दिवाकर कुमरे, सहायक प्राध्यापक, आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क, चिमूर, उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रथम सत्राची सुरुवात सकाळी 6:00 वाजता वार्मअप आणि स्ट्रेचिंग सोबत झाली. त्यानंतर पद्मासन, सुखासन, ताडासन, भुजंगासन, कपालभाती, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि शवासन इत्यादींची एक शृंखलाबद्ध पद्धतीने डॉ. दिवाकर कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करण्यात आला. या कार्यशाळेत सकाळी 10:00 वाजता सहभागी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

द्वितीय सत्रात डॉ. दिवाकर कुमरे यांनी 'योग आणि आरोग्य' या विषयावर महत्त्वाचे मार्गदर्शन केले. डॉ. अमीर धमानी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नियमित योगाभ्यास ही तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बिजनकुमार शील, तसेच आभार प्रदर्शन डॉ. युवराज बोधे यांनी केले. कार्यशाळेत महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)