अखेर अपघाताला निमंत्रण देणारा 'तो' जीर्ण वृक्ष तोडला #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0
सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही

भद्रावती:- तालुक्यातील घोडपेठ येथील महामार्गालगत असलेल्या एका महाकाय जिर्ण वृक्षावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.२० जून रोजी कुऱ्हाड चालविल्यामुळे घोडपेठ येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

प्राप्त माहितीनुसार, घोडपेठ येथील राज्य महामार्गावर एक भले मोठे जीर्ण झाड अनेक वर्षांपासून उभे होते. हे जीर्ण झालेले झाड केव्हा पडेल याचा नेम नव्हता. तसेच या झाडामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. या झाडामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे हे झाड तोडण्यात यावे अशी मागणी घोडपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे यांनी प्रसारमाध्यमांमार्फत शासनाकडे केली होती. याशिवाय हा जीर्ण वृक्ष तोडण्यासाठी अनेक निवेदनही देण्यात आली होती.

अखेर या सर्वांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जीर्ण वृक्ष तोडल्यामुळे घोडपेठ येथील नागरिकांना व महामार्गावरील वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे. घोडपेठ येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर व रस्त्याच्या अगदी कडेला असलेला हा वृक्ष अतिशय जिर्ण झालेला होता. या जीर्ण वृक्षामुळे शाळेचे विद्यार्थी,गावकरी व महामार्गावरील वाहतूकदारांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या वृक्षाच्या जीर्ण असलेल्या फांद्या पडून किरकोळ अपघातही झाले होते. कोसळण्याच्या अवस्थेत असलेला हा वृक्ष अपघाताला एक प्रकारचे निमंत्रण देत होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)