अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना बौध्द बांधवांतर्फे एक लाख रुपयाचे धम्मदान

Bhairav Diwase
0

ब्रम्हपुरी :- नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव या चोवीस वर्षीय बौध्द युवकाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गावात जयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गुंडांनी निर्घृण हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले अनेक ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चे आंदोलने करण्यात आली. ब्रम्हपुरीतही बौध्द समाज बांधव तालुका ब्रम्हपुरी यांच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चाचे काढण्यात आला होता.


दिनांक २० जून ला ब्रम्हपुरी तालुका बौध्द समाज बांधवाच्या वतीने भीमसैनिक अक्षय भालेराव यांच्या नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेण्यात आली.घडलेली घटना अत्यंत निंदनीय आणि पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रास काळीमा फासणारी आहे.अक्षय भालेराव यांच्या आई भाऊ व परिवारातील सदस्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.समाज बांधव आपल्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे असून आवश्यक ती मदत ब्रम्हपुरी तालुका बौध्द समाज बांधव करतील असे आस्वस्त करण्यात आले.भेटीदरम्यान बौध्द समाज बांधव तालुका ब्रम्हपुरी यांच्या वतीने अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला रोख एक लाख रुपये धम्म दान करण्यात आले.

याप्रसंगी बौध्द समाज बांधव तालुका ब्रम्हपुरी यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत डांगे,ऍड.आशिष गोंडाणे,रवी मेश्राम,भीमराव बनकर,पदमाकर रामटेके,लीलाधर वंजारी,डेविड शेंडे,प्रफुल फुलझेले,मदन शेंडे,रक्षित रामटेके,डेनी शेंडे यांनी प्रत्यक्षात भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)