Click Here...👇👇👇

सरदार पटेल महाविद्यालयात ‘योग दिन’ उत्साहात साजरा #chandrapur

Bhairav Diwase

योगामुळे आपले भावनिक, मानसिकसह शारीरिक आरोग्य चांगले राखू शकतो:- प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर

चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात २१ जून रोजी 'जागतिक योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान योग ही भारताने जगाला दिलेली एक भेट आहे. आज संपूर्ण विश्वात योग दिन साजरा केला जात असून योगामुळे आपले भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राखू शकतो असे प्रतिपादन सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी येथे बोलतांना केले.

येथील सरदार पटेल महाविद्यालयातील शांताराम पोटदुखे सभागृहात जागतिक योग दिनानिमित्याने महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा आयोजित महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांसाठी योग प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला योग प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक व मार्गदर्शक कैलास घुमडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सी.जे. खैरवार, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. विजय ई. सोमकुवर, डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, अहेरी येथील श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

महविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,रसेयोचे स्वयंसेवक, खेळाडू आणि विद्यार्थांनी या उपक्रमात सहभागी होऊन योगासने केलीत. योग शिक्षकांनी योगासनांचे महत्त्व यावेळी सांगितले. यावेळी पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने करण्यात आलीत. केंद्र सरकारतर्फे निश्चित केलेले शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.