आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून पारडगाव येथील कॅन्सरग्रस्ताला आर्थिक मदत #chandrapur #bramhapuri


ब्रम्हपुरी:- तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी असलेले संदीप पिलारे (वय ३५ वर्ष) हे मागील ६ महीन्यांपासुन कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहेत.त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.मात्र ते अल्पभूधारक शेतकरी असल्याने उपचारादरम्यान आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.

सदरची बाब पारडगाव येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर इसमाला वैद्यकीय उपचारासाठी हातभार लागावा म्हणून आपल्या वतीने तात्काळ आर्थिक मदत दिली.

सदरची आर्थिक मदत देतांना माजी सरपंच राजेश पारधी,ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादाजी ढोरे,सरपंच पिंटु पिल्लेवान,राजू ढोरे,राजेश्वर कुथे,जयदेव कार, एकनाथ दिघोरे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या