महिलांनी आत्मरक्षण करणे काळाची गरज:- डॉ. अंकुश आगलावे #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

भद्रावती:- महिलांनी आत्मरक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सेन्साई डॉ. अंकुश आगलावे यांनी जागतिक कराटे दिनाच्या निमित्ताने आयोजित चांदा कराटे कप-२०२३ च्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून केले.

सदर कार्यक्रम १८ जून रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय भद्रावती येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मागासवर्गीय आयोग, न्यु दिल्ली चे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेन्साई डॉ. आगलावे पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलींना आत्मरक्षण करण्याचे धडे कराटे खेळाच्या माध्यमातुन दिले गेले पाहिजे. तसेच प्रत्येक शाळेमध्ये कराटे प्रशिक्षकाची नेमणुक केली पाहीजे. आजची परिस्थिती बघता दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांना कराटेच्या माध्यमातून आत्मरक्षण करण्यास प्रोत्साहीत करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मागील ३० वर्षापासून कराटे कपचे आयोजन करण्यात येत आहे. कराटे खेळाच्या माध्यमातून अनेक महिलांना आत्मरक्षाणाचे धडे शिकविले गेले आहे. तसेच भद्रावती शहरातून जिल्हा, राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रशिक्षित स्पर्धकांना पाठविण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन ॲमेचर स्पोर्टस कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपूर डिस्ट्रीक व एलन थिलक शितो न्यु कराटे स्कुल इंटरनॅशनल चंद्रपूर व सहआयोजक नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंजि. रमेश राजुरकर, हाजी अहेतशाल अली, अविनाश पुंड, करण देवतळे, युवराज धानोकर, निलेश गुंडावार, आशुतोष गयनेवार, वात्मीक खोब्रागडे, सिहांन नागदवने, सिंहान कुसराम, आयोजन समिती व राज्यातील नामवंत प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)