ओवीची नवोदयच्या परीक्षेत यशस्वी भरारी #chandrapur

Bhairav Diwase
0

सिंदेवाही:- तालुक्यातील प्राजक्ता विद्यामंदिर,सिंदेवाही येथील वर्ग 5 ची विद्यार्थिनी ओवी कैलास मेश्राम हिने नवोदयच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.ओवीने यासाठी अथक परिश्रम घेत आपल्या जीवनातील अमूल्य वेळ तीने या परीक्षेच्या तयारीसाठी खर्ची घातला होता.त्यामुळे ओवी ही या गोड बातमीच्या प्रतीक्षेत होती.आणी आज तिची प्रतीक्षा नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल दिनांक 22 जुन 2022 ला लागल्याने संपली.निकालात ओवीला परिश्रमाचे गोड फळ चाखायला मिळाले आहे.त्याचप्रमाणे तिच्या या यशाने ओवीच्या शाळेतील शिक्षकवृदांचे तथा पालकाचे नाव लौकिक करून गुणगौरव मिळविले आहे.

भविष्यात ओवीचं मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे.असं ती आपल्या आई वडिलांना सांगते.मात्र हे स्वप्नपूर्ती होण्याकरिता तिच्या यशाच्या मार्गातली एक यशस्वी पायरी तीने ओलांडली आहे.त्यामुळे पालक वर्गात व शिक्षकवृंदाकडून ओवीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.ओवी ही पुढील शैक्षणिक वाटचाल अर्थातच इयत्ता 6 वीचे शिक्षण नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून घेणार आहेत.पुढील वाटचालीकरिता ओवीला अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)