मानसिक नैराश्यातून इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या #chandrapur #pombhurna #suicide


पोंभूर्णा:- चार महिण्यापुर्वी पत्नीचे निधन झाले या दुःखाने मानसीक नैराश्यातून दारूच्या आहारी गेलेल्या पोंभूर्णा शहरातील शास्त्री नगर येथील एका इसमाने विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.आपल्या राहत्या घरापासून जवळ असलेल्या नंदू तुम्मुलवार यांच्या शेतातील विहिरीत पडून त्यांनी आत्महत्या केली आहे.सुखदेव कवडू कोसरे वय ३५ वर्ष असे आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे.सदर घटना २८ जुनला सकाळी दहा वाजता च्या सुमारास उघडकीस आली.मृतक मागील २५ जुनपासून बेपत्ता होता.याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

मृतक सुखदेव हा पोंभूर्णा शहरातील शास्त्री नगर येथील रहिवासी असून तो मोलमजुरीचे काम करायचा चार महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.पत्नीच्या दुःखाने तो मानसिक नैराश्यात गेल्याने तो दारुच्या आहारी गेला होता.मानसिक नैराश्यातून तो २५ जूनला रात्रो दिड वाजताच्या दरम्यान घरून निघून गेला होता.याबाबत घरच्यांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.दि.२८ जुन बुधवारला सकाळी १० वाजताच्या दरम्यान नंदू तुम्मूलवार यांच्या शेतातील विहिरीत प्रेत तरंगताना दिसून आले.याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पश्चात आई,मुलगी,मुलगा व भाऊ असा परिवार आहे.

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोंभूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणेदार मनोज गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार यांनी केल्यानंतर घटनेचा पुढील तपास बिट जमादार सुधाकर तोडासे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत