रानडुक्कराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक गंभीर जखमी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा:- पोंभूर्णा येथून कामकाज आटपवून दुकाकिने बोर्डादीक्षित येथे निघालेल्या दुचाकीस्वाराला डुक्कराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे सदर घटना दि.५ जूनला रात्री ९ वाजताच्या सुमारास पोंभूर्णा- कसरगट्टा मार्गावर घडली.कालिदास पेंदोर वय ४० रा.बोर्डा दिक्षीत वर्ष असे मृतकाचे नाव आहे तर‌ गोविंदा कुमरे वय ४५ वर्ष रा.बोर्डा दिक्षीत हा गंभीर जखमी आहे.

सोमवारला पोंभूर्णा येथील कामकाज आटपून रात्री ९ वाजताच्या दरम्यान दुचाकीने बोर्डा दिक्षीतकडे निघाले होते. पोंभूर्णा- कसरगट्टा रोडवर रात्री ९ वाजताच्या दरम्यान रानडुकरांचा कळप आडवा आला व रानडुक्कराने दुचाकीस्वाराला धडक दिली.अपघातात कालिदास पेंदोर याचा मृत्यू झाला तर गोविंदा कुमरे हा गंभीर जखमी झाला.त्याला तात्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमीवर उपचार सुरू आहे.अपघाताचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)