वाघाच्या हल्ल्यात गाय ठार #chandrapur #tiger #tigerattack


भद्रावती:- उन्हाळ्याच्या दिवसात वाघाचा धुमाकूळ कमी झाल्याचे वाटत असतानाच तालुक्यातील मांगली परिसरात पट्टेदार वाघाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका गाईला ठार केल्याची घटना मांगली शेत शिवारात दि.१३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.

मांगली परिसरातील विवेकानंद विद्यालयाच्या मागील परिसरातील एका शेतशिवारात पाळीव जनावरे दुपारच्या वेळेस चरत असताना दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने चरत असलेल्या गाईवर हल्ला केला. ही घटना लगतच्या शेतात काम करीत असलेल्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला.मात्र या हल्ल्यात सदर गाईचा मृत्यू झाला.सदर गाय ही मांगली येथील गजानन उताणे यांच्या मालकीची असून तिची अंदाजे किंमत वीस ते पंचवीस हजार रुपये असल्याचे समजते. 

सदर घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्राला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कार्यवाही केली. सदर गाईच्या मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मांगली येथील गावकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या