वरोरा विधानसभा मतदारसंघाने दोन वर्षात तीन बडे नेते गमावले #chandrapur #warora

Bhairav Diwase
0

ॲड. टेमुर्डे, देवतळे व धानोरकर यांच्या निधनाने शोककळा


वरोरा:- वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाने दोन वर्षात माजी मंत्री संजय देवतळे Ex Minister Sanjay Devtale, माजी विधानसभा उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे (Ex Assembly Vice President Adv. Moreshwar Temurde) व खा. बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) या तीन बड्या नेत्यांना गमावले. (Warora assembly constituency lost three big leaders in two years)

कुणबीबहुल मतदारसंघ (Kunbi majority constituency) अशी ओळख असलेल्या भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघावर (On Bhadravati-Varora Assembly Constituency) माजी मंत्री दादासाहेब देवतळे यांचे वर्चस्व होते. राज्यात सर्वत्र शेतकरी संघटनेची जोरदार हवा असताना ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला. विधानसभेचे उपाध्यक्षपद देखील भूषवले. मात्र, लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या ॲड. टेमुर्डे यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले. त्यांचा पराभव झाला. शेतकरी संघटनेतून ॲड. टेमुर्डे यांनी शरद पवार यांचा हात पकडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अखेरच्या श्वासापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

दादासाहेब देवतळे यांच्या अकाली निधनानंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांचा पुतण्या संजय देवतळे यांच्याकडे आले. संजय देवतळे यांनी या मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली. कुणबीबहुल मतदारसंघ असल्याने काँग्रेसने देवतळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. यात त्यांचा पराभव झाला. येथून देवतळे यांचेही चक्र फिरले. खा. बाळू धानोरकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला. कोरोना संक्रमणात माजी मंत्री देवतळे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांनी कोरोनावर मात केली. मात्र हृदयविकाराने त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.

२०१९ मध्ये धानोरकर यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. स्वत: काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढली. धानोरकर पती-पत्नी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकले. परंतु धानोरकर यांना हे पद अधिक काळ उपभोगता आले नाही. ३० मे रोजी त्यांचे निधन झाले. या तीन मातब्बर नेत्यांच्या निधनामुळे वरोरा विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)