वाघ यांच्या बदनामी प्रकरणी आव्हाडांवर कारवाई करा #chandrapur


चंद्रपूर महानगर भाजपा महिलांची मागणी

चंद्रपूर:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र भाजप महीला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची मानहानी केली. व अपशब्द वापरून समाजात त्यांना बदनाम केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी चंद्रपूर महानगर भाजपा महीला आघाडीमार्फत निवेदनातून केली आहे.


भाजपा मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरणाचे काम करीत आहेत. याशिवाय जिथे कुठे महीलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न करतो. यापरिस्थितीत आमच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष यांचे चारीत्रहणन करण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करीत असल्याचे भाजपा महिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. आव्हाड यांचा हा पराक्रम पाहता महिला म्हणून आम्ही शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मॉं जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविल्या जात आहेत. हे कदापी सहन केले जाणार नाही. यापरिस्थीतीत महिला नेतृत्व चित्रा वाघ यांची द्विटरवरून बदनामी करीत मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर महानगर भाजपा महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी महिला शिष्टमंडळात शिला चौव्हाण, प्रज्ञा गंधेवार, प्रभा गुडधे, सिंधू राजगुरे, रेणुका घोडेस्वार, मोनिशा महातव, वंदना संतोषवार आदींचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत