आगीत दुचाकी जळून खाक #chandrapur #bhadrawati #fire #firenews

Bhairav Diwase

भद्रावती:- येथील सुमठाणा परिसरातील चंद्रपूर-नागपुर हायवे लगत असलेल्या प्रभा कॉम्प्लेक्समध्ये एक दुचाकी जळून खाक होण्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
या काॅम्प्लेक्समध्ये जिन्याखाली असलेल्या दुचाकी ला अचानक आग लागली. अचानक धुर निघत असल्यामुळे प्रमोद खोब्रागडे यांनी जाऊन पाहीले असता त्यांना सदर दुचाकीला आग लागली असल्याचे दिसून आले. त्यात एक टिव्ही एस अपाचे कंपनीची दुचाकी जळुन खाक झाली.
प्रमोद खोब्रागडे हे उमेश अलोने यांच्या प्रभा कॉम्प्लेक्स मध्ये किरायाणे राहतात. त्यांची एक दुचाकी जळुन खाक झाली तर दुसऱ्या दुचाकीला त्यांनी वेळेवर बाजुला केले. त्यामुळे दुसऱ्या दुचाकीचे नुकसान झाले नाही.