Top News

खनिकर्म विभागाची कार्यवाही; महसूल विभागाचे अधिकारी रजेवर? #Chandrapur #gondpipari


चंद्रपूर:- जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात खनिजाची मोठी लूट सुरु आहे. अवैध मार्गाने रेती, मुरूम यांची दिवसाढवळ्या तस्करी सुरू असताना महसूल विभागाने डोळे बंद केले आहे. 

जिल्हातून खनिकर्म विभाग कार्यवाहीसाठी गोंडपिपरीत आला असताना महसूल विभागातील कर्मचारी रजेवर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.खनिकर्म विभागाणे रेती घाटावर कार्यवाही केली. मात्र रेतिघाट दाखविण्यासाठी महसूल विभागातील एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. अखेर मानधन तत्त्वावर असलेल्या वाहनचालकाला सोबत घेऊन खनिकर्म विभागातील अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली. या प्रकारणे खनिज चोरांशी असलेले महसूल विभागाचा संबंधाची चर्चा रंगली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सहा दिवसापूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा रेती घाटावर खणीकर्म विभागाने कार्यवाही केली होती. अवैध मार्गाने रेती घाटावर रेतीचा उपसा करीत असल्याचं विभागाला दिसून आलं.विभागाने एक पोकलान, हायवा ताब्यात घेतली.या कार्यवाहीसाठी खणीकर्म विभागाने गोंडपिपंरी विभागाचे सहकार्य मागितले. मात्र नेमकं त्याच दिवशी तहसीलदार, आरआय,नायब तहसीलदार, तलाठी रजेवर होते. 

अखेर तहसील कार्यालयातील मानधन तत्वावर असलेल्या वाहन चालकाला खणीकर्म विभागाचा कर्मचाऱ्यासोबत पाठविल्या गेलं. चालकासोबात रजेवर असलेल्या राठोड नामक लिपिकाला पाठविल्या गेलं.राठोळ यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले, मी रजेवर होतो मात्र अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे मी रेती घाटावर गेलो.
या कारवाईबाबत तहसीलदार तलाठ्यांना, विचारणा केली असता रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. एन कार्यवाहीच्या दिवशी महसूल विभागाचे कर्मचारी रजेवर असल्याने " अर्थ " पूर्ण चर्चा सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने