यावेळी आगलावे पुढे म्हणाले की, सांस्कृतिक संशोधन संस्था ही पश्चिम बंगाल सरकारच्या मागासवर्गीय कल्याण विभागाची शाखा आहे. या शाखेच्या संशोधनानुसार राज्यात १७९ ओबीसी जाती समाविष्ट असून त्यात ११८ मुस्लिम व ६१ हिंदु जातींचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेनुसार इतर मागास वर्गाला दिलेल्या आरक्षाणात अवैधरित्या पश्चिम बंगाल सरकारने इतर जातीचा समावेश करून मूळ मागासजातीवर अन्याय केल्याचे निदर्शनास आणुन देण्याचे मोलाचे कार्य हंसराज अहीर यांनी केले आहे.
या निमित्ताने डॉ. आगलावे यांनी ग्रामगीता ,भगवी टोपी, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. ते पुढे म्हणाले की अशा प्रकारचे खंबीर नेतृत्व मागास समाजाच्या पाठीशी उभे राहिले तर समाजावर होणारे अन्याय दुर होण्याचे कार्य होईल. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व श्री गुरूदेव प्रचारक उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत