आजच्‍या धकाधकीच्‍या काळात लग्‍नाचा सुवर्ण महोत्‍सव #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- आजची वर्तमान परिस्थिती बघता, जिवनशैलीत शेकडो बदल झालेले दिसून येतात. फास्‍टफूड, जंकफुड, अनियमित जेवण, प्रदुषण, बदलत वातावरण, प्‍लास्‍टीक, ईकचरा, मोबाईल सारख्‍या सर्व संकटांना सहवासात ठेऊन जीवन जगणे सोपे नाही. लठ्ठपणा, मधूमेह, अॅलर्जी, हृदयविकार, चर्मरोग हे तर पाचविलाच पुजले आहे. अश्‍या परि‍स्थितीत जर लग्‍नाचा ५० वाढदिवस साजरा होत असेल तर भुवया उंचावणे स्‍वाभाविक आहे.

शहरातील तुकूम निवासी श्री. ईश्‍वर निंबाजी खोब्रागडे सेवा निवृत्‍त सहायक पोलिस इंस्‍पेक्‍टर वय ७३ वर्षे यांनी त्‍यांचा लग्‍नाचा ५० वा वाढदिवस नुकताच पार पडला.

सविस्‍तर असे की, श्री ईश्‍वर खोब्रागडे यांनी सौ. प्रमिलाताईला लग्‍नाची मागणी घातली त्‍यानुसार वधुचे मुक्‍कामी म्‍हणजे गडीसुर्ला तहसिल मुल जि. चंद्रपूर येथे दि. ११.०६.१९७३ रोजी मंगल परिणय पार पडला. पोलिस विभागात सेवारत होते. या दरम्‍यान त्‍यांना चार अपत्‍य झाले तीन मुल व एक मुलगी असा परिवार आहे. दि. ३० जून २००८ रोजी सेवानिवृत्‍ती झाली. आजमितीस ज्‍येष्‍ठ पूत्र संजय ईश्‍वर खोब्रागडे (पोलिस विभाग), राकेश ईश्‍वर खोब्रागडे (पोलिस विभाग) प्रितम ईश्‍वर खोब्रागडे छायाचित्रकार, चित्रपट निर्माता तर बहीण कविता नमेश भसारकर गृहीणी म्‍हणून सासरी नांदत आहे.

५० व्‍या वर्षाचे सुवर्णजंयती वर्ष म्‍हणून एका छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे होते. या निमित्‍त संगीत रजनीचे आयोजनमध्‍ये पन्‍नास वर्षापुर्वीची हिंदी, मराठी गीते श्रोत्‍यांना भावविभोर करुन गेली. या प्रसंगी मोठ्या पडद्यावर (एल.ए.डी.) काका, काकुचा पोष्‍ट वेडींग सांग सोबतच चंद्रपूरातील पहिल्‍या मराठी चित्रपट ‘’हद्द’’ एक मर्यादाची जोडी देवा बुरडकर व प्रितम खोब्रागडे यांच्‍या ‘’हद्द’’ २ चा नवा टीझर सादर करण्यात आला. योगायोग असा की, ईश्‍वर खोब्रागडे यांचा लग्‍नाचा ५० वा वाढदिवस. देवा बुरडकरचा लग्‍नाचा ८ वा वाढदिवस, राकेश ईश्‍वर खोब्रागडेचा जन्‍मदिवस असा त्रीवेणी संगम कार्यक्रमाला लाभला. विशेष म्‍हणजे १९७३ ला झालेल्‍या लग्‍नाला ७३ व्‍या वयात ५० वर्षे झाली हे ही नसे थोडके आजा, आजी, मुल, सुना, नातवंड यांनी एकाच स्‍टेजवर संगीत, गीतावर धमाल नृत्‍य करुन पारिवारीक एकोप्‍याचे दर्शन घडविले तेव्‍हा मात्र उपस्थितांचे डोळे मात्र पाणावले कारण विभक्‍त कुटूंब पध्‍दतीने जगणारे अनेक जण एकत्र कुटूंब पध्‍दती एवढी सुंदर असते त्‍यांची जाण आज झाली असे उद्गार काढतांना दिसले. असे प्रसिध्‍दीप्रमुख प्रकाश परमार यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)