Top News

साहेब! शेतात कोसळलेले वीज खांब केव्हा उचलणार? #korpana


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- पावसाळा अगदी तोंडावर आला असताना कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथील शेतकरी रमेश रामचंद्र उरकुडे यांच्या शेतात दोन महिन्यांपूर्वी कोसळलेले विजेचे खांब अद्यापही उचलण्यात आलेले नाहीत. महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता पाऊस आल्यानंतर खरिपातील पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.

तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथील शेतकरी रमेश रामचंद्र उरकुडे यांच्या शेतात एप्रिल महिन्यात आलेल्या पाऊस आणि वादळाने शेतातील वीज खांब कोसळल्याने खांबावरील वीजतारा खाली कोसळल्या. त्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र आता खरिपात या कोसळलेल्या वीजतारा आणि खांब मशागत करण्यासाठी अडसर ठरत असल्याने शेतकरी रमेश उरकुडे यांनी गडचांदूर येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन वीजवाहिनी सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी शेतातील कोसळलेले वीजखांब व तुटलेल्या तारा हटविण्यात आलेल्या नाहीत. पावसाळा अगदी तोंडावर आला असताना शेतकऱ्याने हंगाम करून पेरणी कशी करायची, असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने