महिला पोलिसांकरिता आता चालते फिरते "SHE VAN" प्रसाधनगृह #chandrapur #police #chandrapurpolice

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

चंद्रपूर:- जिल्ह्यात विविध सण/उत्सव/यात्रा दरम्यानचे बंदोबस्त तसेच व्हिआयपी, व्हीव्हीआयपी दौरा/सभा बंदोबस्त आणि अनेक प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या बंदोबस्तात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची ड्युटी लावण्यात येवुन जिल्ह्यातील महिला नागरीकांची सुरक्षिततासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात येत असतो. परंतु अशा प्रसंगी अनेक वेळा असे निदर्शनास आले की, बंदोबस्तादरम्यान डयुटीवर तैनात असलेल्या महिला पोलीसांमध्ये शरीरातील साधी उत्सर्जन क्रिया सर्वात जाचक असल्याचे दिसुन येते.


डयुटी करीत असतांना स्वच्छतागृहांचा त्रास बंदोबस्ताच्या वेळी महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी अधिकच उग्र होतो. पुरुष अंमलदार कुठे तरी आडोशाला जाऊन लघवी करुन घेतो परंतु महिलांनी त्यातही गणवेशातील महिला पोलीसांनी कुठे जायचे, असा थेट प्रश्न पडतो आणि बंदोबस्तादरम्यान नैसर्गिक विधींना अवरोध केल्याने त्याचे दूरगामी परिणाम महिलांवर होवुन त्यांच्या युरिनरी ट्रॅक इन्फेकशनचे प्रमाण वाढीस लागतात. कारण अनेकदा ड्युटी दरम्यान लघवी लागू नये म्हणून महिला पोलीस पाणी पिण्याचे देखील टाळतात.

त्यामुळे पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी महिला पोलीसांच्या आरोग्यावर याचा परिणाम होवु नये म्हणुन कोणत्याही प्रकारच्या मोठ्या बंदोबस्ताचे वेळी ड्युटीवरील महिला पोलीसांना नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी एक अभिनव उपाय योजना म्हणुन पोलीस मोटार परिवहन विभागातील एक जुन्या चारचाकी वाहनाचे नुतनीकरण करून त्यात दोन टॉयलेट आणि एक वॉशरुम सह पाणी व फॅनची व्यवस्था असलेली एक "SHE VAN" फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले आहे.

सदर महिला पोलीसांसाठी तयार केलेले "SHE VAN" फिरते प्रसाधनगृह यापुढे जिल्हयातील विविध बंदोबस्ताचे वेळी महिला पोलीसांच्या सुविधेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे महिला पोलीसांसाठी स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटून त्यांच्या आरोग्य स्वस्थ राहील आणि स्त्रीचे आरोग्य स्वस्थ असेल तर ती शारिरीक व मानसिक दृष्टया अधिक मजबुत होईल. या हेतु/संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी सदर फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले आहे.

सदर वाहनाचे उद्घाटनाचे प्रसंगी चंद्रपूर पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परेदशी, सौ. प्रिती रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय श्रीमती राधीका फडके तसेच मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश आस्कर आणि मॅकेनिक स्टॉफ आणि अनेक महिला पोलीस अंमलदार हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत