प्रेमाला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न #chandrapur #bhadrawati #fire


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याने युवकाने तिच्या घरी जाऊन अंगावर पेट्रोल टाकल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान, हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच मुलीला लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. सिद्धांत भेले (२८ ता. भद्रावती) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (An attempt was made to set a minor girl on fire by pouring petrol on her for refusing love)

आरोपी सिद्धांत भेले आणि पीडित मुलीची एकमेकांना ओळख होती. सोमवारी आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दांत नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्नात असताना कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. आज न्यायालयात हजर केले असता १५ जून २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी युवक व अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या