भारताची ऐतिहासिक भरारी; चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं #chandrapur #ISRO #Chandrayaan-3

Bhairav Diwase
इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं आहे.


आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान आज प्रक्षेपित करण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान - 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे.