Click Here...👇👇👇

कुरोडा रस्ता झाला चिखलमय; विद्यार्थी व ग्रामस्थ त्रस्त

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील व शहरालगतच्या मौजा कुरोडा या आदिवासी व दलित बहुल वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसामुळे अतिशय दैनावस्था झाली असून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व ग्रामस्थांना कमालाची कसरत करावी लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार भद्रावती यांच्याकडे केली.

तालुक्यातील कुरोडा रस्त्यालगत शहरातील विटा उद्योजकांच्या वीट भट्ट्या असून विटासाठी अँशचा वापर होत असल्याने या रस्त्याने अवजड ट्रकांद्वारे वाहतूक केल्या जाते. तसेच येथील विटांची मागणी तेलंगणा व आंध्र प्रदेशात असल्यामुळे मोठ्या व अवजड ट्रकाद्वारे विटांची वाहतूक केल्या जाते. ज्यामुळे या खड्डे पडून रस्त्याची दैनावस्था झाली आहे. कुरोडा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना या रस्त्याने ये - जा करण्याकरीता कमालीची कसरत करावी लागत आहे. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार भद्रावती यांना दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गीता आडे, रोशन मेश्राम, ग्रामस्थ सोमा मरसकोल्हे, प्रकाश आडे, संजय आडे, देविदास मेश्राम, बंडू आडे,रवि आडे आदी उपस्थित होते.