चोरटेही झाले हायटेक; कारमधून आलेल्या आरोपींनी चोरले मोबाईल #chandrapur #chimur


वाहनाचा पाठलाग करून सिनेस्टाईलने दोघाना अटक
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- सद्या चोरटेही हायटेक होत आहेत. चोरीसाठी कारचा वापर करीत आहेत. कार मधून येऊन मोबाईल चोरी करीत आहेत. चिमूर शहरात कारमधुन येऊन मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना चिमूर पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिस सूत्रानुसार, शुक्रवारी फिर्यादी राजू पांडुरंग नंदनवार हे चिमूर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असतांना त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात असलेला 15 हजार किमतीचा मोबाईल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केला. सदर मोबाईल चोरीची त्यांनी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून अज्ञात आरोपींविरोधात गून्हा दाखल केला. आणि सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेणे करिता तपास पथक रवाना करण्यात आले.

चिमूर शहरात हजारे पेट्रोल पंपावर चार संशयित एम एच 40-वाय-6496 या क्रमांकाचे वाहनाने आढळून आले. सदर वाहनाची झडती घेणे करिता वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन घेऊन उमरेड रोडनी पळ काढला. पोलीस पथकांने त्याचा पाठलाग करून सदर वाहनास न्यू राष्ट्रीय शाळेजवळ थांबवून वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये फिर्यादी व्यक्तीचा चोरीस गेलेला मोबाईल व अन्य तीन मोबाईल हँडसेट आढळून आले. त्यामुळे आरोपी नामे धर्मेंद्र गणेश दास कुरील ( वय 55 ) रा. रविदास नगर येरखडा कामठी जिल्हा नागपूर, बलराम कुमार चंद्रदेव महतो, (वय 20) रा. महाराजपुर जिल्हा साहेबगंज झारखंड, हल्ली मुक्काम कळमना वस्ती नागपूर यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात पोलीस स्टेशन चिमूर येथे कलम 379 अन्वये कारवाई करून अटक करण्यात आली. तसेच मोबाईल चोरीसाठी वापरण्यात येणारे वाहनासह 2 लाख 95 हजाराचा माल हस्तगत करण्यात आला.

हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पो.नी. मनोज गभणे यांचे नेतृत्वात पो उप नि.सोरते, पोहवा विलास निमगडे, पोलीस अमलदार सचिन खामनकर, शैलेश मडावी, सचिन साठे, विनायक सरकुंडे, विशाल वाढई यांनी कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या