काय सांगता! "तो" खोदतोय पाणी वाहून जाण्यासाठी वाट! #Gadchandur

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील मोठी नगर परिषद म्हणून ओळख असलेले गडचांदूर शहर मात्र समस्याचे माहेरघर बनले आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्यांची अवस्था चिखलमय झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रस्ता शोधणे अवघड झाले आहे.

त्यांतच गडचांदूर ते अमलनाला रोड प्रभाग क्रमांक ७ मध्ये नालीचे बांधकाम न झाल्याने नागरीकांच्या घरात पाणी जात असल्याने नागरिकांनी स्वताहून पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून दिली. ‌

गडचांदूर ते अमलनाला रोड प्रभाग क्रमांक ७ मध्ये नालीचे बांधकाम मंजुर करुन त्वरित या नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. अशी मागणी प्रभागांतील नागरीकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या