दोन वाहनांची समोरा समोर धडक; ९ जण जखमी #chandrapur #sindewahi

सिंदेवाही:- चिमूर मार्गावरिल पेंढरी-मोटेगाव नजीक दुपारी अंदाजे २.३० वाजताच्या सुमारास टाटा इंट्रो व स्कोर्पियो वाहनांची समोरा समोर धड़क झाल्याने यात ९ जण जखमी झाले असुन चौघांना चंद्रपुर येथील जिल्ह्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. ही घटना रविवार (दि. १६) च्या दुपारची आहे. (A head-on collision between two vehicles; 9 people injured)


मिळालेल्या माहितीनुसार, टाटा इंट्रो वाहन क्रमांक एम एच ४० सी एम २६२९ ही नागपुर वरुन पार्सल देत उमरेड-चिमूर-शंकरपुर होत सिंदेवाहीकडे येत होती. त्याच दरम्यान सिंदेवाही कडून स्कोर्पियो वाहन क्रमांक एम एच ३३ ए ३७२५ ही चिमूरकडे जात होती. रविवार (दि. १६) च्या दुपारी अंदाजे २.३० वाजताच्या सुमारास पेंढरी-मोटेगाव नजीक वडनमार्गावर सिंदेवाही कडून चिमूर च्या दिशेने जाणाऱ्या स्कोर्पियो वाहन व टाटा इन्ट्रो वाहन यांची समोरा समोर धड़क झाली. ही धड़क इतकी भयानक होती कि यात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असुन ९ जन जखमी झाले आहे.

अपघातातील सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रुग्णवाहीकेच्या सहायाने तातडीने भरती करण्यात आले. जखमीं पैकी चार रुग्ण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारा करिता जिल्ह्या सामाण्य रुग्णालय चंद्रपुर येथे रेफर करण्यात आला. जखमी रुग्णामध्ये तेजस सोमेश्वर कोंडेकर (१८) रा. खराडा, मंगेश जयराम खांडेकर (२९) रा. सरडपार (सिंदेवाही), प्रदीप जयराम खांडेकर (२५) सरडपार (सिंदेवाही), चंदा अनिल टिकले (३६) जामसाळा (सिंदेवाही), डिंपल अनिल टिकले (१७) जामसाळा (सिंदेवाही), शैलेश दयाराम चावरे (२४) बामनी (बल्लारशाह), सहादेव शिवलाल राठोड (३१) हिंगना (नागपुर), भूमिका सोमेश्वर कोंडेकर (२२) सरडपार (सिंदेवाही), शिवशंकर अनिल टिकले (१९) जामसाळा (सिंदेवाही) यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत