पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांचं नागरिकांना आवाहन #chandrapur #ACBChandrapur #ACB

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Chandrapur District Anti-Corruption Department) प्रथमच महिला राज आले आहे, अनेक वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार महिला अधिकाऱ्यांजवळ आला आहे. लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग) चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले (Manjusha Bhosale as the new Deputy Superintendent of Police) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्त प्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची (लाच मागणाऱ्या ) थेट तक्रार लाचलुचपत कार्यालयात करण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.

कोण आहेत पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले?

लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग) चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपला यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे.

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक पदाची सूत्रे मंजुषा भोसले यांच्या हाती

लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग) चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याची जवाबदारी मिळालेली असून चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाढत असलेला भ्रष्टाचार व त्यावर आळा घालण्यास अपयशी आलेले प्रशासन बघता आता चंद्रपुरात भ्रष्टाचार करणाऱ्याला माफी मिळणार नसून थेट कारवाई होणार अशी चाहूल मंजुषा भोसले यांच्या मार्फत भ्रष्टाचार करणाऱ्यांना लागली आहे.
पोलीस उपअधीक्षक भोसले यांचं जनतेला आवाहनकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत