समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयात अभाविप चे ठिय्या आंदोलन #chandrapur #abvpchandrapur


चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा चंद्रपूर महानगरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चंद्रपूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे थेट सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

"हम हमारा हक्क मांगते, नही किसी से भीक मांगते" चा नारा देत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून समाज कल्याण येथे ठिय्या आंदोलन केले.


यावेळी चर्चेअंती उपस्थित समाज कल्याण चे अधिक्षक पदावर कार्यरत अधिकारी माकोडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फोनवरून या मागण्यासंदर्भात सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी दिनांक 04 जुलै, 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता बैठक लावून निराकरण करणार असल्याचे आश्वासन दिले.

काय आहेत शासकीय वसतिगृहातील मुलांच्या मागण्या...

1) वसतिगृहातिल विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपुन 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी होवून ही वेळेत शैक्षणिक साहीत्य मिळाले नसल्याने यावर त्वरीत योग्य निर्णय घेत शासन नियमानुसार शैक्षणिक साहीत्य द्यावे.
2) दर माह मिळणारा निर्वाह भत्ता 6 महिन्याच्या दिरंगाइने मिळत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतोय त्यामुळे निर्वाह भत्ता नियमितपणे वेळेत द्यावा.
3) विद्यार्थ्यांना खेळ साहीत्य दिरंगाई न करता उपलब्ध करुन द्यावे.
4) व्यायामशाळेत (जिम) व्यायामाचे साहीत्य उपलब्ध करुन त्वरीत ते सुरू करुन द्यावे.
5) अन्नात, फळांमध्ये अळ्या मिळत असल्याचे वारंवार तक्रार करुनही यावर समाधान झाले नसल्याने भोजनाचा कंत्राटदार बदलावा अथवा जेवणाचा दर्जा सुधारावा त्यासोबत मेस संबंधित नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत आणि याकरिता प्रति विद्यार्थी खर्च होणारी रक्कम वाढवावी.
6) वसतिगृहातील ग्रंथालयात एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आवृत्तीचे पुस्तके उपलब्ध करुन द्यावी.
7) विद्यार्थ्यांना शासनाकडुन देय असणाऱ्या विविध शिष्यवृत्या वेळेत मिळाव्यात यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
8) वसतिगृहातील स्वच्छतेसंदर्भात संबंधित कंत्राटदार/कंपनीला समाधानकारक काम करण्याचे निर्देश द्यावेत.
9) समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर च्या सहाय्यक आयुक्त व वसतिगृहाच्या निरिक्षक/वार्डन पदावर नियमित नियुक्ती असावी.
10) वसतिगृहात अनेकदा शॉर्ट सर्कीट झाला असल्याने वीज पुरवठा वायरिंग व अन्य कामे त्वरीत करण्याचे निर्देश द्यावेत.

या मागण्याकरीता आंदोलन केले यावेळी फोनवरून या मागण्यासंदर्भात सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी दिनांक 04 जुलै, 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता बैठक लावून निराकरण करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी अभाविप प्रदेश मंत्री शक्ती केराम, विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, नगरसहमंत्री पियुष बनकर, नगर विस्तारक रितीक कनोजिया, जिल्हा संघटनमंत्री अमित पटले, अमोल मदने, तन्मय बनकर, आदर्श मास्टे, कुश दवे, हर्ष भांदककर, रोहीत खेडेकर यांच्यासह वसतिगृहात राहणारे विद्यार्थी अनिकेत पुणेकर, मयुर बुरेवार, श्रेयश उराडे, शुभम भोयर, शुभम मिसलवार, स्वप्निल कांबडे, गजानन कोंडागोर्ला, प्रशांत पोशट्टीवार, उमेश पट्टेवाले, तेजस भगत, तारेश डांगे, प्रविण गायकवाड, प्रशिक शेंडे, रितीक मेकाले, प्रज्वल ताकसांडे, चेतन नारनवरे, हिमांशु अमृतकर, पवन गायकवाड, कुलदीप रामटेके यांच्यासह अन्य विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या