विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळेना अन् महाविद्यालय प्रवेश होईना? #Chandrapur #Maharashtra #mahadbt

Bhairav Diwase
0

शैक्षणिक वर्ष संपले तरी रखडलेली शिष्यवृत्ती मिळणार केव्हा? संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल

चंद्रपूर:- सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, म्हणून केंद्र व राज्य सरकार निव्वळ शिक्षण शुल्काची शिष्यवृत्तीच्या रूपाने परतफेड करण्यासाठी कोट्यवधी रुपये देत असले, पण प्रत्यक्षात याचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी १-२ वर्षे लागतात. शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्तीची रक्कम मिळेना’ शिष्यवृत्तीची रक्कम केव्हा मिळेल? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी सरकारला विचारला आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी महाविद्यालय चक्रा मारावे लागत आहे.


विद्यार्थ्यांना नवीन सत्रात प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला मिळेना?

प्रथम वर्षाच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शेवटचे वर्ष उजाडावे लागले. तरी पण एक-दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळालीच नाही. शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन सत्रात किंवा अन्य महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा सोडण्याचा दाखला घेण्यासाठी महाविद्यालय गेले तर शिष्यवृत्ती अद्याप आली नाही असे सांगून शुल्क आकारले जात आहे. शिष्यवृत्ती योजना लवकर मिळावी यासाठी राज्य सरकारने हालचाली करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास?

शासन एकीकडे शिष्यवृत्ती जाहीर करते. मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्रासदायक शिष्यवृत्ती देवून शासन नेमके काय साध्य करते? असा सवालही विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

प्रत्यक्षात मात्र शैक्षणिक वर्ष संपून गेल्यानंतरही शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही?
 
प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रवेशसंख्येवर शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रवेश घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे शिष्यवृत्ती रक्कम दोन ते तीन महिन्यांत विद्यार्थ्याच्या बॅँक खात्यात ती जमा होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र शैक्षणिक वर्ष संपून गेल्यानंतरही शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही. 

राज्य सरकार याकडे लक्ष देणार का?

बहुतांश विद्यार्थ्यांचे सन २०२१-२२२०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची स्कॉलरशिप अजून पर्यंत विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिष्यवृत्ती फॉर्म भरून सुध्दा अजून पर्यंत शिष्यवृत्ती मिळाली नाही. २०२३-२४ शैक्षणिक वर्षाची महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिष्यवृत्ती जर मिळाली नाहीतर तर महाविद्यालयातून शाळा सोडल्याचा दाखला देण्यात येणार नाही. आताच्या परिस्थितीत १०,००० ते २०,००० रूपये महाविद्यालयात भरणे विद्यार्थ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने शिष्यवृत्ती योजनेकडे तातडीने लक्ष घालावे. जेणेकरून विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने राज्य सरकार लवकरच निर्णय घेतील असा विश्वास विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)