Top News

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचा १०८ वा वर्धापन दिवस साजरा #chandrapur #ballarpur


बल्लारपूर:- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, गोरक्षण वॉर्ड, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे बुधवार दिनांक ०५ जुलै, २०२३ रोजी एस.एन.डी. टी.महिला विद्यापीठाचा १०८ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ०५ जुलै १९१६ ला विद्यापीठाची स्थापना केली होती. आज विद्यापीठ १०८ वा वर्धापन दिवस साजरा करीत आहे.
यावेळी कार्यक्रमात ज्ञानसंकुलाचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांना वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला सक्षमीकरणासाठी अग्रेसर असलेल्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई प्रमाणेच बल्लारपूर येथे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लवकरच वटवृक्ष होईल सोबतच या भागातील महिलांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करेल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १०८ व्या वर्धापन दिनाच्या औचित्ताने ज्ञानसंकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड, समन्वयक वेदांत अलमस्त, सौ. वैशाली बोमकंटीवार, आशिष नुगुरवार, सौ.ममता भेंडे, मनोज अरगेलवार आदिंसह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने